दयानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयापैकी दयानंद विज्ञान हे एक स्वतंत्र विज्ञान महाविद्यालय आहे . दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना १ ९ ६१ साली झाली . परिसरातील युवकांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत या हेतुने संस्थेचा जन्म झाला . गेल्या ६० वर्षात संस्थेस मिळालेला प्रतिसाद , हेतु सफल झाल्याचे सिध्द करतो .
प्रारंभी कला , वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा एकाच महाविद्यालयात समाविष्ठ होत्या . विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि विज्ञान शिक्षणास मुक्तव्दार प्राप्त व्हावे म्हणून केवळ विज्ञान शाखा असलेले हे महाविद्यालय १ ९ ६७ मध्ये वेगळे करण्यात आले . अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातील एकमेव विज्ञान महाविद्यालय आहे . महाविद्यालयाने आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची ६० वर्ष पूर्ण केले असून ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , आकृति बंधाच्या धोरणानुसार या महाविद्यालयास शासनाची मान्यता आहे .
आज महाविद्यालयास शैक्षणिक उंची प्राप्त झाली आहे . त्यामागे संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , संयुक्त सचिव , विश्वस्त मंडळ , कार्यकारी संचालक , तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग , मेहनती व सेवाभावी शिक्षकेत्तर कर्मचारी , त्याचबरोबर हुशार व होतकरु विद्यार्थी , जाणकार पालक व हितचिंतक यांचे योगदान मोलाचे आहे . अखंड ज्ञानसाधना , कठोर शिस्त , प्रभावी अध्यापन , उत्कृष्ट निकाल याव्दारे महाविद्यालयाने आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे . विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून योग्य शैक्षणिक नियोजन करण्याबरोबरच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची ओळख आहे .
इ.स. १ ९८७-८८,१९८८-८९ व १ ९ ८ ९ ९ ० या सलग तिन्ही वर्षी महाविद्यालयाचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत ( १२ वी ) सर्वप्रथम येऊन हॅट्रीक साधणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच महाविद्यालय आहे . तेव्हापासून दरवर्षी आजतागायत महाराष्ट्रात पहिला , दुसरा , कधी कधी तिसरा येण्याचा मान महाविद्यालयाने सातत्याने टिकविला आहे . CET परीक्षेतही २०० पैकी १ ९९ गुण घेऊन महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान महाविद्यालयास मिळाला आहे . केवळ मराठवाडयातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या महाविद्यालयाने आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे .