MHT-CET परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे घवघवीत यश
दरवर्षीप्रमाणेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाने MHT-CET परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
चि. शिंदे ओंकार प्रकाश या विद्यार्थ्याने MHT-CET परीक्षेत PCM ग्रुपमध्ये 99.7766 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे चि. किंगे प्रणव नितीन या विद्यार्थ्याने 99.7528 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून व्दितीय क्रमांक मिळविला आहे तर चि. पवार आदित्य अशोक या विद्यार्थ्याने 99.4288 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून तृतिय क्रमांक मिळविला आहे.
99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 5 विद्यार्थी आहेत. 98 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 10 विद्यार्थी आहेत तर 95 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 54 विद्यार्थी आहेत आणि 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 98 विद्यार्थी आहेत.
तसेच PCB ग्रुपमध्ये चि. चंद्रात्रे मयंक मंदार या विद्यार्थ्याने MHT-CET परीक्षेत 99.9497 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे चि. निखील नावंदर या विद्यार्थ्याने 99.9397 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून व्दितीय क्रमांक मिळविला आहे तर कु. हुकीरे शिवकन्या सुनील या विद्यार्थीनीने 99.0503 पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून तृतिय क्रमांक मिळविला आहे.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष ललीतभाईजी शहा, उपाध्यक्ष रमेशकुमारजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, डॉ. चेतनजी सारडा, संजयजी बोरा, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाशजी दरगड, उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, पर्यवेक्षक हेमंत वरूडकर, पर्यवेक्षक उमाकांत झुंजारे, सीईटी समन्वयक डॉ. डी. एम. सूर्यवंशी, जेईई समन्वयक प्रा. रवी कुमार, प्रा. बळवंत सूर्यवंशी, प्रा. विजयकुमार मांदळे, प्रा. व्यंकट कैले, प्रा. संतोष शेळगे, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव, नीट सह-समन्वयक श्री. नितेश दुधभाते, श्री. महेंद्र कोराळे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.